अकरा तालुक्यात रूग्ण संख्या निरंक

जळगाव (प्रतिनिधी) – कोरोनाच्या अहवालात रविवारी काहीसा दिलासा मिळाला आहे. आज रविवारी २९ रोजी जिल्ह्यात २३ रूग्ण आढळून आले आहेत तर ३५ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तब्बल अकरा तालुक्यात आठवडाभरानंतर रुग्णसंख्या निरंक आली आहे.
आजच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यातील एकुण आकडा ५४५२५ वर पोहचली आहे, यापैकी ५२६७७ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे तर ५५१ रूग्ण उपचार घेत आहे. रविवारी १ रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झाली आहे.
जळगाव शहर १४, जळगाव ग्रामीण २, भुसावळ ३, बोदवड १, यावल १, इतर जिल्हा २ असे २३ रुग्ण आढळले आहे. तर अमळनेर, एरंडोल,चोपडा,पाचोरा,भडगाव,धरणगाव,जामनेर, रावेर ,चाळीसगाव, मुक्ताईनगर,पारोळा असे अकरा तालुक्यात रूग्ण संख्या निरंक आढळून आली आहे.तर बोदवड (३), धरणगाव (४), पाचोरा (१०) हे तालुके कोरोना मुक्तीकडे वाटचाल करीत आहेत.







