यावल ( प्रतिनिधी ) – मालोद ग्रामपंचायत कार्यालयातून एलईडी टीव्ही, डीव्हीआर हार्ड डिस्क, कॅमेरा असा ३३ हजार ३५० किमतीचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून लंपास केला आहे. यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मालोद येथील ग्रामपंचायत कार्यालयाचे दरवाजाचे कडीकोंडा व कुलूप तोडून २७ मे संध्याकाळी ते २८ मे च्या सकाळ दरम्यान अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केली त्यांनी १६ हजार ५०० रुपये किमतीचा एलईडी टीव्ही, सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे २ जीबी क्षमतेची १३ हजार ३०० रुपयांची हार्ड डिस्क तसेच ३ हजार ५०० किमतीचा आयपी कॅमेरा असा ३३ हजार ३५० रुपयांचा ऐवज चोरून नेला मालोदचे ग्रामसेवक राजू तडवी यांच्या फिर्यादीनुसार यावल पोलिसात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पो उ नि विनोद खांडबहाले करीत आहेत.