धरणगाव ( प्रतिनिधी ) – साकरे ते कंडारी बु रस्त्यावर बैलगाडीला मागून मोटारसायकलने दिलेल्या धडकेत मोटारसायकलस्वाराचा मृत्यू झाला आणि अन्य दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना घडली धरणगाव पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उत्तम भिल ( वय ५० रा. कंडारी बु ता. धरणगाव ) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार उत्तम भिल यांचा मुलगा विजय भिल व त्याचा मित्र सोमनाथ भिल हे विजय चालवित असलेल्या मोटारसायकल (क्रं. एमएच१९ एजी ४१९७) ने कंडारी बु. येथे घरी येत होते. यावेळी राजेंद्र पाटील बैलगाडीने रस्त्याने जात असतांना त्यांच्या शेताजवळ विजय भिल याने त्याचा ताब्यातील मोटरसायकल रस्त्याचा परिस्थितीकडे दुर्लक्ष करून बैलगाडीस मागून धडक मारली. यात रस्त्यावर पडल्यावर विजयच्या डोक्याला, तोंडाला, छातीला मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला. सोमनाथ भिल गंभीर जखमी झाला. धरणगाव पोलीस ठाण्यात विजय भिल याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोहेकॉ खुशाल पाटील हे करीत आहेत.