जळगाव (प्रतिनिधी) – जिल्हा शल्यचिकित्सकांकडून माहिती अधिकारात मुख्यमंत्री सहायता निधीची माहिती दिली जात नाही. यामुळे शिवसेना (उबाठा) गटाचे महिला आघाडीच्या महानगरप्रमुख गायत्री सोनवणे यांच्यासह कार्यकर्त्यांनी सोमवारी २९ पैकी जिल्हाधिकारी कार्यालयसमोर धरणे आंदोलन केले.
शासनाच्या वतीने राज्यात मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी योजनेच्या माध्यमातून गरजू रूग्णांना खासगी रूग्णालयात उपचार मिळण्याची सोय म्हणून निधी वितरीत करण्यात येतो. परंतू या निधीबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होतील अशा पध्दतीने कार्यपध्दती दिसून येत असल्याचे शिवसेना ठाकरे गटाचे म्हणणे आहे. . महिती अधिकारात जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे माहिती मागितली होती. परंतू शल्य चिकित्सक कार्यालयातून उत्तर देण्यास टाळाटाळ करीत आहे. दरम्यान, लोकशाहीलाच धरून आणि लोकहित व जनहितासाठीच ही माहिती मागितली होती. त्यामुळे नाईजास्तव या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी २९ मे रोजी सकाळी ११ वाजता एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.
जळगाव शहरातील ज्या खासगी रूग्णालयात ही योजना राबविली जाते. त्याची माहिती देण्यात यावी, किती रूग्णांना लाभ मिळाला, मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून कक्षात रूग्णाच्या नावाने किती निधी मिळाला. याबाबत संपुर्ण तपसील मिळावा अशी मागणी करण्यात आली आहे. दोन दिवसाच्या आत मागण्या मान्य न झाल्यास पुढील लढाई न्यायालयाच्या माध्यमातून लढविली जाणार असल्याची प्रतिक्रीया गायत्री सोनवणे यांनी दिली आहे.