यावल ( प्रतिनिधी ) – यावल तालुक्यातील नायगाव येथील घराला शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्याची घटना सोमवारी २८ मार्च रोजी सकाळी घडली. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे.
यावल पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, यावल तालुक्यातील नायगाव येथील विकास गोविंदा कोळी (वय-३६) हे आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. सोमवारी २८ मार्च सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास घरात शॉर्टसर्कीटमुळे अचानक घराला आग लागली. या आगीत घरातील संसारोपयोगी वस्तू यात सामान, पत्रे, फ्रीज, कपडे, महत्वाची कागदपत्रे, टीव्ही असा एकुण ४० हजार रूपयांचे नुकसान झज्ञले आहे. घटनेची माहिती मिळताच गावातील ग्रामस्थांनी धाव घेऊन आग विझविण्यासाठी मदत केली होती. याप्रकरणी विकास होळी यांच्या खबरीवरून यावल पोलिसांनी अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार अजिज शेख करीत आहे.