जळगाव ( प्रतिनिधी ) – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या समर्थनार्थ शहरामध्ये शिव कॉलनीजवळ राष्ट्रीय महामार्गावर एकत्र येत त्यांना पाठींबा दिला त्यांनीं संजय राऊत यांच्या वक्तव्याचा निषेधही केला.
गुलाबराव पाटील समर्थक शिवसैनिक सुनील पाटील यांनी सांगितले की गुलाबराव पाटील यांनी तीस वर्षांपासून शिवसेनेसाठी भरपूर काम केले तीस पस्तीस केसेस अंगावर घेतल्या आणि संपूर्ण जिल्हा नव्हेच तर उत्तर महाराष्ट्रामध्ये शिवसेना मजबुतीसाठी अहोरात्र काम केले. शिवसेनेचे संजय राऊत यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर अतिशय खालच्या पातळीवर टीका केल्याबद्दल सर्व शिवसैनिकांमध्ये तीव्र नाराजी आहे आम्ही त्यांचा निषेध करतो
यावेळी मनोज पाटील , भूषण पाटील , सचिन गोळबे, भरत पवार, संजय महाजन, गणेश राठोड, अमित तिवारी , राहुल पाटील, डॉ गजानन पाटील, अॅड सुनील पाटील, राहुल पाटील, संदीप भालेराव, शेखर साळुंखे, प्रल्हाद महाजन आदी उपस्थित होते