चोरट्यांकडून २१ दुचाकी हस्तगत; जळगावच्या दुचाकींचा समावेश
जळगाव (प्रतिनिधी) – मलकापूर शहर पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी गस्तीवर असताना संशयावरून २ तरुणांना अटक केली. त्यांच्या तपासामध्ये त्यांच्यासह आणखी काही तरुणांनी विविध जिल्ह्यातून दुचाकी चोरी केल्याची निष्पन्न झाले असून त्यांच्याकडून २१ दुचाकी हस्तगत करण्यात आले आहेत. त्यात जळगाव जिल्ह्यातील दुचाकींचा समावेश आहे.
दि. २१ जुलै रोजी फिर्यादी राम विजय राऊत, रा.ब्दारका नगर, मलकापुर यांनी अज्ञात आरोपीने त्यांची मोटार सायकल होन्डा शाईन क्र.एम.एच.३०, ए.जी.८३२ चोरुन नेल्याबाबत दिलेल्या रिपोर्ट वरुन भा.द.वि. कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्यातील आरोपी व गेल्या मोटार सायकलचा शोध घेत असतांना अट्टल मोटार सायकल चोर आकाश उर्फ संतोष रावळकर आणि रामशंकर मनोहर भोलानकर, दोन्ही रा. कु.हा (काकोडा), ता. मुक्ताईनगर, जि. जळगांव है त्यांच्या ताब्यातील मो.सा. ने धरणगांव नाक्याकडुन कु-हा गावाकडे जातांना दिसल्याने पो.स्टे.च्या डि.बी.पथकाने त्याचा पाठलाग करुन त्यास पकडले व त्यांच्याकडेस असलेल्या विना नंबरच्या होंडा शाईन काळ्या रंगाचे मोटार सायकलबाबत त्यास विचारपुस केली.
त्याने उडवा उडवीचे उत्तरे दिल्याने सदर गाडीच्या इंजिन नंबर आणि चेसिस नंबर वरुन पडताळणी केली असता ती गुन्ह्यातील चोरी गेलेली मोटार सायकल असल्याचे स्पष्ट झाले. त्या दोघांनाही गुन्ह्यात अटक करुन त्यांना मोटार सायकल चोरी बाबत अधिक विचारपुस करता त्यांनी व त्याचे साथीदार पवन संजय जवरे, प्रशांत समाधान बोरले उर्फ मोईखेडे दोन्ही कु-हा, ता. मुक्ताईनगर, जि. जळगांव, अमरदिप बाबुराव उमाळे, रा. बहापुरा, ता. मलकापुर, जि. बुलढाणा व संतोष समाधान कवळे रा. आडवीहीर, ता. मोताळा, जि.बुलढाणा अशांनी मिळुन राज्यात व राज्याबाहेर वेगवेगळ्या ठिकाणावरुन मोटार सायकल चोरी केल्या आहेत. त्या वेगवेगळ्या ठिकाणी विकल्या आहेत. अशा प्राथमीक माहीती वरुन नमुद आरोपीतांचा कसोशिने शोध घेवुन त्यांना सदर गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे.
त्यांच्याकडुन आज पावेतो होंडा शाईन कंपनीच्या ५, सी.डी. ११० कंपणीच्या २, एच.एफ. डिलक्स कंपनीच्या ३, पेंशन प्रो. कंपनीच्या ३, स्लेंडर प्रो व प्लस कंपनीच्या ५, होंडा युनिकान कंपनीची १, होंडा एक्टीवा १,ड्रिम युगा १ अशा एकुण १२ लाख ६० हजार रुपये कि.च्या एकुण २१ मोटार सायकल जप्त करण्यात आल्या आहेत.
पो.स्टे. हद्दीत व परिसरात मो.सा. चोरीचे प्रमाण वाढल्याने मा. अरविंद चावरिया साहेब पोलीस अधिक्षक बुलडाणा, मा. श्रावण दत्त, अप्पर पोलीस अधिक्षक खामगांव, मा. अभिनव त्यागी सा उपविभागिय पोलीस अधिकारी मलकापुर, मा. पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपुत साहेब यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली मलकापुर शहर पोलीस स्टेशनचे डी.पी.पथकाचे अधिकारी सपोनि सुखदेव भोरकडे, परी पो.उप निरी. बालाजी सानप, पो.हे.का. भगवान मुंढे, पो. कॉ. ईश्वर वाघ पोका संतोष कुमावत, पोका अनिल डागोर, पोका असिफ शेख, पोका सलीम बरडे, पोका प्रमोद राठोड, गोपाल तारळकर यांनी केली आहे पुढील तपास डी.पी.पथकाचे स.पो.नि. भोरकडे व डी.बी. स्टाप करीत आहेत.
या आहेत दुचाकी नंबर
1) MH-44,N-5303, 2)MH-28,AW-7650, 3) MH-19,BD-9474, 4) MH19, BR-8628, 5) MH-28, AE 7832, 6) MH28,AP-3494, 7) MH-19, BW-7564, 8) MH-19, CB 9019, 9) MH-32, AA -0446, 10) MH-19, DF 2575, 11) MH 28, AP 2356, 12) MH 28, AT 6216, 13)MH -28 AM -1905, 14) MH – 28, AA – 4269, 15) युनिकॉन विना नंबर इंजिन नं. KC09E4072501, 16) बिना नंबरची स्प्लेंडर इंजिन नं. 00M18M03802, 17) होंडा शाईन बिना नंबर इंजिन नंबर JC36E77951241, 18) CB शाईन बिना नंबर इंजिन JC73E80048330, 19) MH 30,AG 70832, 20) MH 28, AK 1290, 21) MH 728, N 5652 3 असुन त्या चोरी झाल्याबाबत पो.स्टे. जळगांव एम.आय.डी.सी., भुसावळ बाजारपेठ, मुक्ताईनगर, मलकापुर शहर, मलकापुर एम.आय.डी.सी., नांदुरा, खामगांव शहर, शेगांव शहर, वर्धा शहर अशा ठिकाणी त्या चोरी झाल्याबाबत गुन्हे दाखल आहेत.