वास्तु आरोग्यमच्या कार्यकारी संचालक सौ.आकांक्षा कुलकर्णी या जळगावातील पहिल्या नॅशनल लिडरशिप कोर्सच्या पदवीधारक

जळगाव (प्रतिनिधी) – येथील सुप्रसिद्ध वास्तु आरोग्यमच्या कार्यकारी संचालक सौ. आकांक्षा निखील कुलकर्णी या श्री सत्य साई सेवा ऑर्गनायझेशन भारत व श्री सत्य साई इन्स्टिट्युट ऑफ हायर लर्निंग प्रशांती निलायमतर्फे घेतल्या जाणाऱ्या श्री सत्य साई नॅशनल लिडरशिप प्रोग्राम फॉर सेल्फ ट्रान्सफोर्मेशन डिसेंबर २०२० साठी ९ महिन्यांच्या सर्टिफिकेट कोर्सच्या जळगाव जिल्ह्यातून एकमेव महिला पदवीधारक ठरल्या आहेत.
सदर कोर्स हा लिडरशिप संबधीत असून या कोर्ससाठी संपूर्ण भारतातून १३ हजार नामांकन प्राप्त झाले होते त्यातून १८२ जणांची निवड करण्यात आली होती. त्यात ७३ महिलांचा समावेश होता त्यातून जळगाव व धुळे जिल्ह्यातून सौ. आकांक्षा कुलकर्णी यांनी एकमेव महिला पदवीधारक होण्याचा मान मिळविला आहे. हा कोर्स सत्य साई युनिव्हर्सिटी ऑफ हायर लर्निंग पुट्टपर्तीतर्फे आयोजित करण्यात आला होता. त्यात मार्च ते डिसेंबर २०२० या
कालावधीत ९० तासांच्या ऑनलाईन कोर्सचे व आंध्र प्रदेशातील पुट्टपर्ती येथे तीन दिवसाचे रहिवासी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
सदर कोर्स मध्ये उत्तीर्ण होण्यासाठी सौ. आकांक्षा यांनी लिडरशिप संबंधीत विश्लेषण केले.
सौ. आकांक्षा कुळकर्णी या वास्तु आरोग्यम् आयएसओ मानांकीत संस्थेच्या सीईओ असून विधीज्ञ निखील कुलकर्णी यांच्या पत्नी तर सुप्रसिद्ध वास्तु तज्ज्ञ व मास्टर डाऊजर डॉ. अविनाश कुलकर्णी यांच्या कन्या आहेत. सौ. आकांक्षा नेहमीच सत्य साई युनिव्हर्सिटी ऑफ हायर लर्निंग पुट्टपर्तीतर्फे आयोजित होणाऱ्या ऑनलाईन कोसेर्समध्ये सहभागी होतात.
या यशाबद्दल त्यांचे सॅटर्डे क्लब जळगाव, डॉ. राहुल मयूर, योग प्रबोधिनी संस्था जळगावतर्फे योग प्रशिक्षक कृणाल महाजन, आपण पब्लिकेशनचे मनोज गोविंदवार,एसएसडीचे संचालक दिनेश थोरात वास्तु आरोग्यम्चे संस्थापक डॉ. अविनाश कुळकर्णी, अँड. निखील कुळकर्णी, वास्तु आरोग्यम् परिवार यांच्यासह अनेक संस्था व मान्यवरांकडून अभिनंदन होत आहे.







