जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कर्मचाऱ्याची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. दुचाकीची चोरी करतांना चोरटा सीसीटीव्हीत कैद झाला आहे. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गणेश प्रभाकर ईखे (वय – ३२) रा. चिंचोली, ता.जि.जळगाव हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. ते जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांच्या वाहनाचे चालक म्हणून नोकरीला आहे. नोकरीवर येण्या – जाण्यासाठी ते (एमएच १९ एझेड १०९९) क्रमांकाची दुचाकी आहे. दुचाकीचा वापर दैनंदिनी कामासाठी वापर करतात. गुरूवार २७ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता गणेश ईखे हे नेहमीप्रमाणे दुचाकीने कामावर आले. शासकीय महाविद्यालयाच्या गेट नंबर २ मधील कर्मचाऱ्यांच्या पत्र्याच्या शेडमध्ये त्यांनी त्यांची दुचाकी पार्क करून लावली व कामावर निघून गेले. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांची ४० हजार रूपये किंमतीची दुचाकी चोरून नेली. रात्री ८ वाजता घरी जाण्यासाठी ते दुचाकीजवळ आले असता त्यांना दुचाकी आढळून आली नाही. त्यांनी परिसरात शोधाशोध केली परंतू दुचाकीचा शोध लागला नाही. पार्किग झोनमध्ये लावलेल्या सीसीटीव्हीत दुचाकी चोरून नेतांना चोरटा कैद झाला आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून शुक्रवार २९ फेब्रुवारी रोजी दुपारी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास जुबेर तडवी करीत आहे.