मुंबई (वृत्तसंस्था) – राज्यात 1 मे पासून कोरोना प्रतिंबधात्मक लसीकरण मोहीम राबवण्यात येईल, असे राज्य सरकारने यापूर्वी सांगितले होते. मात्र, काल आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकारांशी बोलताना 1 मे पासून पुरेशा लसींअभावी लसीकरणाची मोहीम राबवता येणार नाही असे सांगितले होते यावरून भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी टोपेंवर कडक शब्दात टीका केली आहे. आरोग्यमंत्र्यांनी गांजा ओढून प्रेस घेतली होती का ? असा सवाल त्यांनी केला.

काल सकाळी राज्याच्या पालकमंत्र्यांनी घोषित केलं की एक तारखेपासून आम्ही 18 ते 45 वयोगटातील लोकांचे आम्ही लसीकरण करणार आहोत. नंतर 4 वाजता सांगितलं की ते करता येणार नाही. म्हणजे हे लोक पुरते गोंधळलेले आहेत. सकाळी जी प्रेस घेतली होती, ती गांजा ओढून घेतली होती का ? यांना उठ सूट केंद्राकडे बोट दाखवायचं आहे. यांना कोणताही अजेंडा नसताना हे तिघे एकत्र आले आहेत,’ असे गोपीचंद पडळकर म्हणाले.







