मुंबई (वृत्तसंस्था) – करोनाच्या दुसऱ्या लाटेचा येऊन मुकाबला करत असताना लसीकरणात होणाऱ्या विलंबाने करोनाच्या तिसऱ्या लाटेचा मार्ग खुला होऊ शकतो, असा इशारा वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.
लसीचे पुरेसे डोस उपलब्ध होत नसल्याने एक मे पासून 18 वर्षापुढील नागरिकांचे लसीकरण सुरू करता येणार नसल्याचे राज्य सरकारने स्पष्ट केल्याच्या पार्शवभूमीवर हा इशारा देण्यात आला आहे. राज्याला लसीचा कमी प्रमाणात पुरवठा होत आहे, त्याबद्दल राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनीही चिंता व्यक्त केली आहे. अपुऱ्या लस पुरावठ्यामुळे सध्या सुरू असणाऱ्या 45 वर्षापुढील नागरिकांच्या लसीकरणातही अडचणी येत आहेत.
देशातील दोन तृतीयअंश लोकसंख्या लसीकरणाच्या या टप्प्यात येणार आहे. त्यांचे लसीकरण झाल्यानंतर खऱ्या अर्थाने करोनाला पायबंद घालता येणार आहे. राज्यातील नऊ कोटी जनतेपैकी आपण केवळ दीड कोटी जनतेला आतापर्यंत लास दिली आहे. ही संख्या अत्यंत नगण्य आहे,असे आरोग्य खात्यातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. 16 जानेवारीपासून आरोग्य कर्मचाऱयांसाठी लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली. त्याचा विस्तार करून आघाडीचे करोना योध्ये आणि 45 वर्षावरील नागरिकांना यात सामावून घेतले. मोहिमेचे हे टप्पे लावर पूर्ण करायला हवे हकते, वझे ते म्हणाले.
जर आपण लसीकरणाचा वेग वाढवला नाही तर नागरिक तातविणे किंवा काहीसे नंतर नोकरी धंद्यासाठी बाहेर पडतील, आणि हे इतसर्या लाटेसाठी आमंत्रण असेल, असा इशारा त्यांनी दिला. डिसेंबरमध्ये निर्बंध शिथिल केल्यानंतर लोकांना निष्काळजी बनवले आणि त्याचा परिणाम फेब्रुवारीत दुसरी लाट येण्यात झाला. आजही त्याची झळ आपण सोसत आहोत , याकडे त्यांनी लक्ष वेधले.
जर आपण लोकसंख्येच्या मोठ्या गटाचे लसीकरण करू शकलो नाही तर आपण तिसऱ्या लाटेसाठी रेड कार्पेट घालत आहोत,असा इशारा रयांनी दिला. राज्यात एप्रिल महिन्यात 15 लाख53 हजार 922 बधितांची नोंद झाली आहे. तर 11 हजार291 मृत्यू झाले आहेत. या पार्श्वभूमीवर सरकारला 20 मे पूर्वी भारत बायोटेक आणि सिरम इन्स्टिट्यूट यांच्याकडून लस मिळणे कठीण असल्याचे तोळे यांनी बुधवारी स्पष्ट केले आहे.
अशा स्थितीत आपण 1 मे रोजी लसीकरण सुरू करत शकत नाही. त्यासाठी आपणास मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत थांबावे लागणार आहे. पावसाळ्यात मुसळधार पाऊस, दरडी कोसळणे आशा अनेक अडचणी या मोहिमेत येण्याची शक्यता आहे, असे त्यांनी सांगितले.
जर विषाणूमध्ये असेच म्युटेशन (बदल) होत राहिले तर लसीकरणाच्या उद्देशालाच हरताळ फासला जाईल. जर आपण लसीकरणासाठी असाच वेळ लावला तर कदाचित नव्या म्युटेशनमध्ये लसीची प्रतिकारशक्ती असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे या विषाणूच्या जनुकीय संरचनेवर संशोधन करणाऱ्या एका संशोधकांनी सांगितले.
वैद्यकीय संशोधकचा लसीकरण राखडल्याने इशारा
मुंबई- करोनाच्या दुसऱ्या लाटेचा महाराष्ट्र मेटाकुटीला येऊन मुकाबला करत असताना लसीकरणात होणाऱ्या विलंबाने करोनाच्या तिसऱ्या लाटेचा मार्ग खुला होऊ शकतो, असा इशारा वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.
देशातील दोन तृतीयअंश लोकसंख्या लसीकरणाच्या या टप्प्यात येणार आहे. त्यांचे लसीकरण झाल्यानंतर खऱ्या अर्थाने करोनाला पायबंद घालता येणार आहे.
राज्यातील नऊ कोटी जनतेपैकी आपण केवळ दीड कोटी जनतेला आतापर्यंत लास दिली आहे. ही संख्या अत्यंत नगण्य आहे,असे आरोग्य खात्यातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. 16 जानेवारीपासून आरोग्य कर्मचाऱयांसाठी लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली. त्याचा विस्तार करून आघाडीचे करोना योध्ये आणि 45 वर्षावरील नागरिकांना यात सामावून घेतले. मोहिमेचे हे टप्पे लावर पूर्ण करायला हवे हकते, वझे ते म्हणाले.
जर आपण लोकसंख्येच्या मोठ्या गटाचे लसीकरण करू शकलो नाही तर आपण तिसऱ्या लाटेसाठी रेड कार्पेट घालत आहोत,असा इशारा त्यांनी दिला. राज्यात एप्रिल महिन्यात 15 लाख53 हजार 922 बधितांची नोंद झाली आहे. तर 11 हजार291 मृत्यू झाले आहेत.
या पार्श्वभूमीवर सरकारला 20 मे पूर्वी भारत बायोटेक आणि सिरम इन्स्टिट्यूट यांच्याकडून लस मिळणे कठीण असल्याचे तोळे यांनी बुधवारी स्पष्ट केले आहे. अशा स्थितीत आपण 1 मे रोजी लसीकरण सुरू करत शकत नाही. त्यासाठी आपणास मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत थांबावे लागणार आहे. पावसाळ्यात मुसळधार पाऊस, दरडी कोसळणे आशा अनेक अडचणी या मोहिमेत येण्याची शक्यता आहे, असे त्यांनी सांगितले.