चोपडा ( प्रतिनिधी ) – चोपडा तालुक्यातील रेल मारूती मंदीराजवळ भरधाव ट्रकने दिलेल्या जोरदार धडकेत दुचाकीवरील मामा – भाची जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. मयतात सहा वर्षाच्या चिमुकलीचा समावेश आहे.
सुत्रांकडून मिळालेली माहितीवरून, चोपडा तालुक्यातील रेलच्या मारुती मंदिरासमोरील नागमोडी वळणावर चोपड्याकडून धरणगावकडे जाणारी दुचाकी (एमएच १९ सीएच ५१७४) ला समोरून येणारा ट्रक क्रमांक (एचआर ५६ बी ४६८८) ने जोरदार धडक दिल्याची घटना शुक्रवार २८ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात एक सहा वर्षीय विधी कोळी नामक बालिका आणि दुचाकी चालक आबा कोळी (रा. दहिदुले ता.धरणगाव) जागीच ठार झाले आहे. तर एक महिला गंभीर जखमी आहे तर दीड वर्षीय चिमुकला मात्र, सुखरूप आहे. अपघाताची माहिती मिळतात चोपडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना चोपडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.