जळगाव( प्रतिनिधी ) – शहरातील सुभाष चौक येथील सुभाष डेअरी समोरून महिलेच्या कापडी पिशवीतून २ लाख ११ हजार २०० रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने चोरून नेले आहे. याबाबत शनीपेठ पोलीस स्टेशनला गुरूवारी अज्ञात चोर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीवरून, यशोदा संतोष कोळी ( वय – ७० ) रा. कठोरा, ता.जि.जळगाव या आपल्या कुटुंबियांचा राहायला आहे. २२ ऑक्टोबर रोजी दुपारी ३.३० ते पावणेचार वाजेच्या दरम्यान वृद्ध महिला या जळगाव शहरातील सुभाष चौकातील सुभाष डेअरी समोर या ठिकाणी बाजार करण्यासाठी आलेल्या होत्या. दरम्यान त्यांच्याजवळ असलेल्या कापडी पिशवीतून तब्बल २ लाख ११ हजार २०० रुपये किमतीचे सोन्या – चांदीचे दागिने असा मुद्देमाल चोरून नेला. दरम्यान वृद्ध मेल्याच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी सर्वत्र शोध घेतला, परंतु कुठेही माहिती मिळाली नाही, अखेर गुरुवार २७ ऑक्टोबर रोजी दुपारी ४.३० वाजता वृद्ध महिला यांनी शनीपेठ पोलीस स्टेशनला तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेबाबत पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल परिस जाधव करीत आहे.