मुंबई (वृत्तसंस्था) – सर्वसामान्यांसाठीही मुंबई लोकल सुरु करा, अशी मागणी करणारे पत्र राज्य सरकारने रेल्वेला लिहिले आहे. दिवसभरात तीन टप्प्यांत प्रवासाची मुभा देण्याची मागणी पत्रातून करण्यात आली आहे. रेल्वे मंत्रालयाकडून उत्तराची अद्याप प्रतीक्षा आहे.

सकाळी 7.30 वाजल्यापासून सर्वसामान्यांना प्रवासाची मुभा द्या, सकाळी आठ ते साडेदहा वाजल्याच्या दरम्यान अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल सुरु ठेवा. तर सकाळी 11 ते दुपारी 4.30 या वेळेत सर्वसामान्यांसाठी लोकल प्रवासाची मुभा द्या, अशी मागणी करण्यात आली आहे.
सामान्यांसाठी लोकल कधी सुरु होणार हे अद्याप अस्पष्टच आहे. सरकारने सध्या फक्त शक्यतांवर प्रतिसाद मागितला आहे.







