सत्यशोधक विवाह पद्धत काळाची गरज

अमळनेर (प्रतिनिधी) – एरंडोल येथिल महात्मा फुले ब्रिगेडचे नाशिक विभागीय उपाध्यक्ष रविंद्र पितांबर महाजन यांची द्वितीय कन्या चि.सौ.का.भुवनेश्वरी आणि रतन दौलत महाजन रा कुंझर यांचे द्वितीय सुपुत्र यांचा विवाह दि. २८नोव्हेंबर शनिवार रोजी सत्यशोधक पध्दतीने विवाह संपन्न झाला. या सत्यशोधक विवाह सोहळ्याचे प्रास्ताविक सागर योगराज महाजन यांनी केले,सत्यशोधक विवाह विधी “सत्यशोधक विचार मंचचे संस्थापक अध्यक्ष श्री भगवान शामराव रोकडे, कैलाश जाधव चाळीसगाव,तसेच श्री शिवदास जगन्नाथ माळी एरंडोल यांनी काम पाहिले.या विवाह सोहळ्यास आजी माजी नगरसेवक सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील पदाधिकारी व बहूसंख्येने बहुजन समाज बंधू-भगिनींना इ.उपस्थित होते. सत्यशोधक विवाह सोहळा मुलीकडे एरंडोल येथे करण्यात आला होता. या सत्यशोधक विवाह सोहळ्यात वर – वधू यांनी क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले व विद्येची देवता सावित्रीमाई फुले यांचे वेश परिधान केल्यामुळे आलेल्या वऱ्हाडी मंडळींचे लक्ष वेधून घेतले. कोणत्याही प्रकारचा मानपान केला नाही ठराविक मंडळींना फेटे तसेच आलेले स्थानिक लोक प्रतिनिधी इत्यादी मंडळींचा शाल नारळ इ. देऊन सत्कार केला नाही सर्व मंडळी आपल्यासाठी सारखीच तोलामोलाचे आहेत.
लग्नपत्रिका वाटण्यासाठी मोबाईल, Email, Whats App, पोस्ट खाते, कुरियर इ. उपलब्ध असताना स्वत: घरोघर जाऊन पत्रिका वाटणे ही पद्धत बंद झाली पाहिजे. घरोघरी गावोगावी पत्रिका वाटताना खूपच दमछाक होते. दुर्दैवाने अपघात सुद्धा घडतात. परंतु ते आमच्या घरी स्वतः आले होते. आपण नाही गेलो तर ते नाराज होतील. लग्नाला येणार नाहीत. अशी भावना दूर झाली पाहिजे. घरी पत्रिका द्यायला या असा आग्रह आता तरी धरु नये. जुन्या दमछाक करणाऱ्या रूढी परंपरा बदलल्या पाहिजेत. या गोष्टीस अनुसरून आपणही या सत्यशोधक विवाहात कोणत्याही प्रकारच्या पत्रिका न छापता सर्व आमंत्रणे Whats App व स्वतः वैयक्तिक फोन करून द्यावी आसे मोलाचे मार्गदर्शन आलेल्या मान्यवरांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले. सत्यशोधक विवाह सोहळ्याचे आयोजन करून हा आदर्श एरंडोलच्या वैराळे ( महाजन )परिवाराने घालून दिला. त्यामुळे महाजन परिवारांचे एरंडोल तालुक्यात सर्वत्र अभिनंदन व कौतुक केले जात आहे. या सत्यशोधक विवाह सोहळ्यास नगराध्यक्ष रमेश परदेशी,उपनगराध्यक्ष योगेश महाजन,माजी.तहसीलदार अरुण माळी,अतुल महाजन,गजानन महाजन,महात्मा फुले ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष शिवाजी महाजन, जिल्हा सोशल मीडिया प्रमुख शितल महाजन,जिल्हा संपर्क प्रमुख, भिकन महाजन,जळगाव शहराध्यक्षा संगीता महाजन,कुणाल महाजन,प्रमोद महाजन,रुपेश महाजन,सौ नगरसेविका हर्षाली महाजन,महात्मा फुले ब्रिगेड,महात्मा फुले युवा मंच, बालाजी मढी, नागोबा मढी, देशमुख मढी, महात्मा फुले मित्र मंडळ एरंडोल यांनी सहकार्य केले व मोठ्या संख्येने पदाधिकारी,सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.







