लग्नाचे वऱ्हाडी थोडक्यात बचावले ; एक महिला गंभीर

फैजपूर (प्रतिनिधी) – यावल तालुक्यातील हिंगोणा गावाजवळ यावल -फैजपूर रस्त्यावर क्रुझर कार वळण घेत असतांना चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला उलटले. हे वाहन अडावद येथून लग्नाचे वऱ्हाड घेऊन बऱ्हांणपूरकडे जात होते. यात १० ते १२ जण किरकोळ जखमी झाले असून एक महिला गंभीर जखमी झाल्याने तिला जळगावात उपचारासाठी पाठविण्यात आले आहेत.
मध्यप्रदेशातील कार क्रमांक (एम पी ०९ – बी.सी. ३६०८) हे क्रुझर वाहन अडावद येथे लग्नसमारंभाच्या कार्यक्रमाला वऱ्हाड घेऊन गेले होते. अडावद येथून लग्नाचा कार्यक्रम आटोपून परतत असतांना यावल ते फैजपूरच्या रस्त्यावर वळण घेत असतांना चालकाचे अचानक नियंत्रण सुटले. वाहन रस्त्याच्या कडेला पलटी झाल्याने त्यात १० ते १२ जण किरकोळ जखमी झाले. एका महिलेची प्रकृती गंभीर झाल्यामुळे तिला तातडीने जळगावच्या खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. सदर जखमींना फैजपूर येथील डॉ. खाचणे यांच्या दवाखान्यात उपचारार्थ हलवण्यात आले होते.
घटनेची माहिती मिळताच फैजपूर पोलीस स्टेशनचे एपीआय प्रकाश वानखेडे यांच्या सुचनेवरून हवालदार विनोद पाटील, सुरदास भोई, होमगार्ड धनगर, पो.पा. दिनेश बाविस्कर यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांच्यासह काही नागरिकांनी जखमींना उपचारासाठी दाखल केले.
जखमींची झालेल्यांमध्ये सकीनाबी शेख रशीद (वय 45), नजमाबी शेख रफीक (वय 50), आक्सीया इम्रान पटेल (वय 20), आलीया पिंजारी (वय 10 ) रा. पिंपळगाव बसवंत, नाशिक, शमीम शेख असलम (वय 30) रा. बऱ्हाणपूर , नजाबी शेख पिंजारी (वय 50) रा. सुरत, रेहान शेख (वय 6) , फातीमाबी मुनीर खान (वय 50) रा. बऱ्हाणपूर, सईदा सत्तार मन्सुरी (वय 50), इसरतबी शेख रहीम पिंजारी (वय 25), नसीमबी शेख गफूर, यास्मीन जाकीर पिंजारी, अनज जाकीर पिंजारी (वय 12) यांचा समावेश आहे.







