जळगाव (प्रतिनिधी) – येथील जिल्हा प्रशासनाने स्थापन केलेल्या टास्क फोर्सचे सदस्य डॉ. लीना पाटील यांचा आर्या फौंडेशनतर्फे कोरोना योद्धा म्हणून महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांच्या हस्ते सन्मानपत्र देत सन्मान करण्यात आला.

टास्क फोर्स सदस्य डॉ.लिना पाटील,भूलशास्त्र तज्ज्ञ यांनी कोरोना विषाणू विरोधी लढ्यात महत्वपूर्ण योगदान दिले. म्हणून त्याचा सत्कार करण्यात आला. यावेळी मंत्री यशोमती ठाकूर यांनी लीना पाटील यांच्या कार्याचे कौतुक केले. यावेळी आ.शिरीष चौधरी,जिल्हाधिकारी अभिजित राऊत, पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.एन.एस.चव्हाण, आर्या फौंडेशनचे अध्यक्ष डॉ.धर्मेंद्र पाटील आदी उपस्थित होते.







