मुंबई (वृत्तसंस्था) – मद्रास हायकोर्टाच्या मदुराई खंडपीठाने नुकत्याच सेक्शुलल जाहिरातींवरून तिखट विधान केले आहे. एका याचिकेवरील सुनावणीदरम्यान मद्रास हायकोर्टाने न्यायाधीश एन. किरुबाकरन आणि बी पुंगलेधी यांच्या खंडपीठाने म्हटले, रात्री १०वाजण्याच्या सुमारास साधारणपणे प्रत्येक टीव्ही चॅनेलवर एकाच प्रकारच्या जाहिराती येतात. काही जाहिराती तर अशा असतात की ज्या खूप विचित्र असतात. यांना लव्ह ड्रग्स असे म्हटले जाते. या जाहिराती पॉर्न फिल्मपेक्षा कमी नाहीत.

कोर्टाने म्हटलेय, सॅटेलाईट टीव्ही चॅनेल्सवर प्रसारित होणाऱ्या काही कंडोमच्या जाहिराती या अश्लील सिनेमांप्रमाणे असताता. यामुळे तरुणाचंच्या मेंदूवर परिणाम होऊ शकतो. अशा जाहिरातींबद्दल चिंता व्यक्त करत कोर्टाने म्हटले की, जाहिरातीत महिलांना अशा प्रकारे दाखवले जाते की शालीनता आणि इतर मापदंडांचे उल्लंघन होते.
न्यायमूर्ती बी पुगलेंधी आणि एन किरूबारकान यांच्या खंडपीठाने सांगितले की टीव्ही चॅनेल रात्री १० वाजल्यानंतर काही जाहिराती दाखवातात ज्यात कंडोमच्या विक्रीला प्रोत्साहन देण्यासाठी नग्रता दाखवली जाते. अशी माहिती केबल टेलिव्हिजन नेटवर्क नियम १९९४ आणि केबल टेलिव्हिजन नेटवर्क अधिनियम १९९५च्या नियमांचे उल्लंघन करतात.
कोर्टाने म्हटले की वेळेतच या गोष्टीवर लक्ष दिले पाहिजे ज्यामुळे अशा प्रकारचे कार्यक्रमांचे कंटेट नियमांचे उल्लंघन करणार नाही. कोर्टाने हे म्हटले की या जाहिराती नियमांचे उल्लंघन करतात. कोर्टाने पुढे म्हटले, केबल ऑपरेटरर्सनी हे निश्चित केले पाहिजे की यामधील महिलांचे चित्रण हे शालीनता राखून केले गेलेले असाावे.
तसेच कोर्टाने आदेश दिला की या प्रकारच्या केबल टेलिव्हजन नेटवर्क नियम १९९४च्या नियम ७(१)नुसार टेलिकास्ट करण्यात आलेल्या कार्यक्रमांमध्ये सबस्क्रायबर्सच्या नैतिकता, शालीनता आणि धार्मिक संवेदनशीलतेला कोणत्याही प्रकारचा धक्का पोहोचू नये. कोर्टाचे म्हणणे आहे की कंडोम आणि उत्तेजनार्थ, आंतरवस्त्रे विकण्याच्या नावावर चालवल्या जाणाऱ्या जाहिराती नियमांचे उल्लंघन करत आहेत.
आदेशमध्ये पुढे असंही म्हटलंय की डॉक्टरांच्या सल्ल्याच्या नावावर तसेच अशा प्रकारच्या जाहिरातींमध्ये नग्नता दाखवली जात आहे. हा कंटेट कुठेही उपलब्ध आहे. मुलेही अशा प्रकारचा कंटेट पाहतात. त्यामुळे अशा प्रकारच्या जाहिराती तरूण आणि मुलांच्या मेंदूवर मोठा परिणाम करतात.







