जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव शहरातील शिवाजीनगर उस्मानिया पार्क परिसरातील शुक्रवार दि. २७ नोव्हेंबर रोजी भंगार व्यवसायीक फकिरा खान उस्मान खान यांचे बंद घर फोडून चेारट्यांनी अडीच लाखांचा ऐवज लंपास केला आहे.फकिरा यांची पत्नी शमिना यांच्या सोबत घरबंद करुन रुग्णालयात गेले असतांना चोरट्यांनी भरदिवसा अवघ्या दिडच तासात बंद घरफोडून घरफोडी केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

शिवाजीनगर विस्तारीत परिसरातील अमन पार्क- अस्मानिया पार्क परिसरात फकिरा खान उस्मान खान कुटूंबीयांसह वास्तव्यास आहेत. शुक्रवार दि. २७ नोव्हेंबर रोजी गर्भवती पत्नी शमिना यांच्या तपासण्यांसाठी सकाळी साडे अकराच्या सुमारास खान दाम्पत्य घरबंद करुन रुग्णालयात गेले होते. दवाखान्याचे काम अटोपुन ठिक एक वाजता देाघेही घरी परतले. घराच्या मुख्य दाराचे कुलूप कापलेले हेाते, आत जाऊन बघताच आतील खोलीतील साहित्य अस्ताव्यस्त फेकलेले लोखंडी कपाटाची तिजोरी उघडून चोरट्यांनी आतील सोने चांदिचे दागिने व एक लाख रुपये रोख असा ऐवज लंपास केल्याचे आढळून आहे. फकिराखान यांच्या तक्रारीवरुन शहर पेालिस ठाण्यात अज्ञात चेारट्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.







