नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – आजकाल अनेक बॉलिवूड आणि टीव्ही सेलिब्रिटी विविध वादग्रस्त शब्द आणि विधानांमुळे वाद ओढवताना दिसत आहेत. असे वाटू लागले आहे जणू हा नवा ट्रेंडच झालाय. आता नुकतेच एक ताजे प्रकरण म्हणजे, बॉलिवूड अभिनेता रणदीप हुडाचे डर्टी जोक. आता यात मुख्य सांगायचे तर या जोक्समुळे रणदीपच्या अटकेची मागणी सोशल मीडियावर होत आहे. माफी माग, याला अटक करा अश्या आशयाच्या कमेंट्स करीत लोक रणदीपच्या चांगलेच मागे लागले आहेत. त्याच्या एका जुन्या व्हिडीओत तो उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांच्याबद्दल अश्लिल विनोद करताना दिसतोय. हा व्हिडीओ सध्या चांगलाच वायरल झाल्यामुळे लोकांचा संताप अनावर झाला.

रणदीपचा हा व्हिडीओ एका इव्हेंटच्या आहे. हा व्हिडीओ व्हायरल होताच, मायावतींचे समर्थक चांगलेच भडकले आहेत. त्यांनी ट्विटरवर रणदीपला असे काही फैलावर घेतले आहे कि बस्स.. इतकेच नव्हे तर यासोबत त्याच्या अटकेची मागणीही लावून धरली आहे.
रणदीप हुडाला अटक करा, आधी माफी माग, रणदीपने माफी मागितलीच पाहिजे. एका महिला नेत्याबद्दल इतकी घाणेरडी विचारधारणा?अश्या आशयाच्या समीक्षा देत या लोकांनी सोशल मीडियावर आपला संताप व्यक्त केला आहे. काहींनी तर रणदीपला अर्वाच्य भाषेत बोलत माफी माग असेही म्हटले आहे.







