नवी दिल्ली(वृत्तसंस्था ) – अॅलोपॅथी मूर्खपणाचं आणि दिवाळखोर विज्ञान आहे. असे म्हणणाऱ्या योगगुरू रामदेव बाबा यांना त्यांचे हे वक्तव्य चांगलेच भोवणार असे दिसते आहे. कोलकत्याच्या सिंधी पोलिस ठाण्यात रामदेवबाबा यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. इंडियन मेडिकल असोसिएशन च्या बंगाल शाखेने त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. आयएमएसए बंगाल शाखेचे माजी अध्यक्ष आणि टीएमसी चे खासदार डॉक्टर शंतनु सिंह यांनी हा एफआयआर दाखल केला आहे. त्यामुळे रामदेव बाबांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

डॉक्टर शांतनु सिंह यांनी याबाबत बोलताना सांगितले की, ‘आधुनिक उपचार पद्धती आणि अॅलिओपॅथी कोरोनावर उपचार करू शकत नाही असे रामदेव बाबा यानाचे म्हणणे आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान यापूर्वी देखील आयएमएन रामदेव बाबांवर गुन्हा दाखल करण्याचा आणि मानहानीचा दावा दाखल करण्याचा इशारा दिला होता.






