जळगाव (प्रतिनिधी) – येथील जुने जळगाव भागातील विठ्ठल मंदीर परिसरात दोन वर्षाच्या मुलाच्या चेहऱ्यावर उकळती चहा पडल्याने त्याचे संपुर्ण तोंड भाजले. शनिवारी २७ मे रोजी हि घटना घडली आहे.
पवन दिनेश बारेला (वय-२) रा. विठ्ठल मंदीर परिसर असे जखमी झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे. जखमी झालेल्या चिमुकल्याला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. दिनेश रमेश बारेला (वय-२६) हा तरूण सेंट्रींगचे काम करून आपला उदरनिर्वाह करतो. शनिवारी २७ मे रोजी सायंकाळी दिनेश बारेला यांची पत्नीने चहा केली होती. चहा करत असतांना पवन हा अचानक जवळ आला. त्याचा धक्का लागल्याने उकळता चहा तोंडावर पडला.
उकळत्या चहामुळे चिमुकल्याचा चेहरा पुर्णपणे भाजला गेला. त्याला शेजारी राहणारे सोनू माधव राठोड याच्या मदतीने जखमी चिमुकल्याला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. त्याचा प्रकृती स्थिर आहे.