जामनेर ( प्रतिनिधी ) – आदिवासी पारधी क्रांती संघटना खान्देश संपर्क अभियाना अंतर्गत आढावा बैठक तसेच मालेगाव तालुका कार्यकारणी व विस्तार हा दि. 27 मे शनिवार रोजी आदिवासी पारधी क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मुकेश साळुंके यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे प्रस्ताविक स्वप्निल शिसव तसेच कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून योगेश सोनवणे कार्यकारी अभियंता नाशिक हे उपस्थित होते. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष मुकेश साळुंके यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात समाजाची समाजव्यवस्था, दिशा आणि दशा याविषयी पोट तिडकेने समाजाविषयी विचार मांडले. समाज बांधवांमध्ये आत्मीयता कशी वाढेल, समाज कशा पद्धतीने संघटित होऊन साक्षर झाला पाहिजे. स्वतःच्या पायावर समाज उभा राहिला पाहिजे, अन्याय अत्याचाराच्या विरोधात उभा ठाकला पाहिजे …असे परखड मत त्यांनी मांडले. तसेच नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष
श्यामकांत चव्हाण, सौ. सिंधुताई सूर्यवंशी, सौ. संगीताताई चव्हाण, राज्य संघटक अमोल सूर्यवंशी,प्रमुख पाहुणे योगेश सोनवणे व नितीन सुर्यवंशी
यांनी आपले मनोगत व्यक्त करताना समाजाला विविध योजनांची सविस्तर माहिती देऊन समाज प्रबोधनपर मार्गदर्शन केले.
व्यासपीठावर राज्याचे महासचिव दिपक खांदे, राज्य सचिव सुरेश सोनवणे, राज्य संघटक अंबरसिंग चव्हाण, मोहन पारधी, अशोक पारधी, नाशिक जिल्हा अध्यक्ष रमेशअण्णा साळुंके , महिला आघाडीच्या सुशीला सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी संपूर्ण नाशिक जिल्ह्याचे प्रमुख पदाधिकारी व मालेगाव तालुक्यातील सोनज, टोकडे, अजंग, वडेल वजीरखेडे, पळासदरे, कंक्राळे, कौळाने, द्याने, सोयगाव, मळगाव व मालेगाव शहरातून मोठ्या संख्येने शेकडो पारधी समाज बांधवांनी उपस्थिती नोंदविली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वप्निल शिसव यांनी व आभार प्रदर्शन श्री संजय साळुंके यांनी मानले. या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी आदिवासी पारधी क्रांती संघटनेचे सर्व पदाधिकाऱ्यांनी जीवाचे रान करून मेहनत घेतली व कार्यक्रम यशस्वी केला.