जळगाव ( प्रतिनिधी ) – २ वर्षापुर्वी भुसावळ शहरातील पीओएच कॉलनी येथुन मोबाईल हिसकवुन मोटारसायकलने पळून गेलेल्या २ आरोपीना आज स्थानिक गुन्हे शाखेने पकडले .
भूसावळ शहर पोस्टे ला भाग ०५ गु.र.न.०४२७/२०२० भादवी क.३९२,३४ प्रमाणे .२६ सप्टेंबर २०२० रोजी दाखल करण्यात आला होता .२६ मार्चरोजी
पो नि किरणकुमार बकाले यांना मिळालेल्या गोपनिय माहीतीवरुन पो.उ.नि. अमोल देवढे , सफौ अशोक महाजन, पोह सुनिल दामोदरे, लक्ष्मण पाटील, पोना किशोर राठोड, रणजीत जाधव, श्रीकृष्ण देशमुख, पोकाँ.विनोद पाटील, मुरलीधर बारी यांच्या पथकाने भुसावळ शहरातील पीओएच कॉलनी येथुन संशयीत आरोपी निकेश मधुकर वानखेडे ( वय २३ रा. कंडारी, भुसावळ ) , सचिन मनोज जाधव ( १९ रा.पाळधी ता.जामनेर) , चोरीचा मोबाईल घेणारा सिध्दांत अरुण म्हस्के ( वय २५ रा. पीओएच कॉलनी ) यांना अटक केली त्यांच्याकडून . सॅमसंग गॅलेक्झी A३० मोबाईल जप्त करून त्यांना भुसावळ शहर पोस्टेच्या ताब्यात देण्यात आले .