एरंडोल ( प्रतिनिधी ) – आडगाव येथील विवाहितेला माहेरहून घरखर्चासाठी २ लाख रुपये आणावे यासाठी मारहाण करून ठार मारण्याची धमकी देणाऱ्या पतीसह पाच जणांविरोधात कासोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एरंडोल तालुक्यातील आडगाव येथील माहेर असलेल्या पूजा रोहित बारगळ (वय-२४) या तरुणीचा विवाह नाशिक येथील रोहित कृष्णा बारगळ याच्याशी झाला. लग्नाच्या सुरुवातीला काही दिवस चांगले गेले. नंतर विवाहितेला माहेरहून २ लाख रुपये घरखर्चासाठी आणावे, अशी मागणी रोहित बारगळ याने केली. परंतु विवाहितेच्या आई-वडिलांची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे ती पूर्तता करू शकली नाही. त्यामुळे विवाहितेला शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरुवात केली. ननंद, सासू आणि नंदोई यांनी देखील पैशांसाठी तगादा लावला. या छळाला कंटाळून विवाहिता आडगाव येथे माहेरी निघून आल्या. कासोदा पोलीस ठाण्यात त्यांनी तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून पती रोहित बारगळ, सासु ताराबाई बारगळ, नणंद मेघाराणी बारगड ( सर्व रा. विष्णुनगर, नाशिक ) , मोठी नणंद वर्षा वनवे, नंदोई रावसाहेब वनवे ( रा. पाथर्डी-फाटा नाशिक) या ५ जणांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पो हे कॉ युवराज कोळी करीत आहेत .