मुंबई ( प्रतिनिधी ) – आमच्यासोबत आलेल्या आमदारापैकी २० आमदार आजही आमच्या संपर्कात आहेत , असा दावा शिवसेनेकडून केला जात असला तरी त्यात तथ्य नाही , तसे असेल तर संपर्कातील आमदारांची नावे त्यांनी सांगावी असे आव्हान बंडखोर गटाचे नेते एकनाथ शिंदे यांनी आज गुवाहाटीतून शिवसेनेला दिले .
गुवाहाटीतील हॉटेलबाहेर माध्यमांशी बोलताना बंडखोर गटाचे नेते एकनाथ शिंदे म्हणाले की , येथे आलेले ५० लोक स्वतःच्या मर्जीने आले आहेत . कुठल्याही आमदारावर जबरदस्ती केलेली नाही या आमदारांवर दबाव असल्याचा दावा खोटा आहे . आमच्यासोबत आलेल्या आमदारापैकी २० आमदार आजही आमच्या संपर्कात आहेत , असा दावा शिवसेनेकडून केला जात असला तरी त्यात तथ्य नाही , तसे असेल तर संपर्कातील आमदारांची नावे त्यांनी सांगावी . पुढची भूमिका आम्ही लवकरच स्पष्ट करू एक भूमिका घेऊन आम्ही येथे आलो आहोत.
आज ६ दिवसानंतर एकनाथ शिंदे गुवाहाटीत माध्यमांपुढे आले होते . गुवाहाटीत गेलेल्या आमदारांपैकी २० आमदार आजही आमच्या संपर्कात आहेत ते मुंबईत आल्यावर त्यांची भूमिका स्पष्ट करतील असा दावा शिवसेनेकडून केला जातो आहे त्यामुळे आज एकनाथ शिंदे यांनी दिलेले प्रत्युत्तर महत्वाचे आहे . यापुढे सगळी माहिती आमचे प्रवक्ते दीपक केसरकर माध्यमांना देतील असेही एकनाथ शिंदे म्हणाले .