मुख्य प्रशासकपदी आ. मंगेश चव्हाण यांच्यासह जिल्ह्यातील ११ जणांचा समावेश
जळगाव (प्रतिनिधी) – राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघावर प्रशासक मंडळाची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार दूध संघाच्या मुख्य प्रशासकपदी चाळीसगाव विधानसभा मतदार संघाचे आ. मंगेश चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्यासह अकरा जणांची प्रशासक म्हणून नियुक्ती झाली आहे.
महाराष्ट्र राज्य कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाने आज सहकारी संस्थेच्या (दुग्ध) सहनिबंधक निबंधकांना जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या मुख्य प्रशासकपदी चाळीसगाव विधानसभा मतदार संघाचे आ. मंगेश चव्हाण यांची नियुक्ती केल्याचे पत्र पाठवले आहे. तसेच पत्रात पुढे म्हटले आहे की, जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या संचालक मंडळाचा ५ वर्षांचा कालावधी तसेच तद्नंतर महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० मधील कलम ७३ मधील तरतूदीनुसार मुदतवाढ देण्यात आली आहे.
प्रशासक मंडळात मुक्ताईनगरचे आ. चंद्रकांत निंबाजी पाटील, चोपड्याचे माजी आ.चंद्रकांत बळीराम सोनवणे, भुसावळचे अजय एकनाथ भोळे, पारोळाचे अमोल चिमणराव पाटील, जामनेरचे अरविंद भगवान देशमुख, चाळीसगावचे राजेंद्र वाडीलाल राठोड, बोदवडचे अशोक नामदेव कांडेलकर, धरणगाव चे गजानन पुंडलिक पाटील, पाचोर्याचे अमोल पंडितराव शिंदे, भडगावचे विकास पंडित पाटील यांचा समावेश आहे.
तसेच दूध संघातील गैरकारभाराच्या तक्रारीवरून एक पाच सदस्य चौकशी समिती देखील शासनाने नियुक्ती केली आहे.
जाणून घ्या…कोण कोण आहेत, प्रशासक मंडळात !
मुख्य प्रशासक : मंगेश रमेश चव्हाण, चाळीसगाव
प्रशासक : चंद्रकांत निबाजी पाटील, मुक्ताईनगर
प्रशासक : चंद्रकांत बळीराम सोनवणे, चोपडा
प्रशासक : अजय एकनाथ भोळे, भुसावळ
प्रशासक : अमोल चिमणराव पाटील, पारोळा
प्रशासक : अरविंद भगवान देशमुख, जामनेर
प्रशासक : राजेंद्र वाडीलाल राठोड, चाळीसगाव
प्रशासक : अशोक नामदेव कांडेलकर, बोदवड
प्रशासक : गजानन पुडलीक पाटील, धरणगाव
प्रशासक : अमोल पंडीतराव शिंदे, पाचोरा
प्रशासक : विकास पंडीत पाटील, भडगाव