आंतरराष्ट्रीय मानवाधिकार परिषदेतर्फे जि. प. सीईओ यांना निवेदन
जळगाव (प्रतिनिधी) – येथील जिल्हा परिषदेचे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक भूषण तायडे हे प्रशासकीय सेवेत असतानाही पत्नीच्या नावाने ठेकेदारी करतात. तसेच कोणत्याही सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना कामे करू देत नाही, असा आरोप आंतरराष्ट्रीय मानवाधिकार परिषदेतर्फे करण्यात आला आहे. चौकशी करून त्यांच्यावर कार्यवाही व्हावी अशीही मागणी करण्यात आली आहे.
भूषण प्रभाकर तायडे हे जिल्हा परिषदेमध्ये स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक म्हणून काम करतात २०१५ सालापासून ते एकाच विभागात काम करत आहेत. आज पावतो ते विद्युत विभागात शाखा अभियंता म्हणून काम करीत आहेत. त्यांनी त्यांची पत्नी कविता भूषण तायडे यांच्या नावावर भूषण इलेक्ट्रिकल नावाने ठेका घेतला आहे. याबाबत जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार अभियंता यांच्या वतीने तक्रार करण्यात आली आहे.
भूषण तायडे यांच्याकडील विद्युत विभागाचा असलेला पदभार काढून घेण्यात यावा, पत्नीच्या नावाने ते जे ठेके येतात, त्यांची चौकशी झाली पाहिजे व ठेका रद्द झाला पाहिजे, भूषण तायडे यांना बांधकाम विभागात भांडार कक्ष प्रमुखही सुद्धा जबाबदारी दिली अशी कळते. ती जबाबदारी अनधिकृत आहे, त्यामुळे तातडीने त्यांचा ठेका रद्द करावा अन्यथा सुशिक्षित बेरोजगार अभियंता तर्फे लाक्षणिक उपोषण केले जाईल, याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांना अंतरराष्ट्रीय मानवाधिकार परिषद तर्फे अध्यक्ष सुरज नारखेडे यांनी निवेदन दिले आहे.