जळगाव (प्रतिनिधी) – महावितरणच्या जळगाव परिमंडल कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. मुख्य अभियंता कैलास हुमणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी श्री.हुमणे यांनी संविधानाविषयी माहिती देऊन संविधानाचे प्रजासत्ताकातील महत्त्व पटवून दिले. कार्यक्रमास प्रभारी अधीक्षक अभियंता राजेंद्र मार्के, व्यवस्थापक तन्वी मोरे यांच्यासह परिमंडल, मंडल, विभाग कार्यालयांतील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.