जळगाव ( प्रतिनिधी ) – माहिती अधिकार कार्यकर्ता दिपक गुप्ता यांचेवरील गुन्हे लक्षात घेऊन त्यांना मिळालेले पोलीस संरक्षण काढून 2 वर्षासाठी जिल्हातून हद्दपार करा , या मागणीचे निवेदन आज जळगावात राज्यपाल कोशारी यांना रिपाइं आठवले गटाच्या पदाधिकाऱ्यांनी दिले .
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया (आठवले गट) जळगावच्या या निवेदनात म्हटले आहे की, दिपक गुप्ता यांच्यावर महाराष्ट्रात, जिल्ह्यात तथा शहरात विविध गंभीर स्वरूपाचे 12 गुन्हे दाखल आहेत . दिपक गुप्ता हे आजपर्यंत विज चोरून वापरत होते, तक्रार अर्ज केल्यानंतर त्यांनी अधिकृत मिटर बसवुन घेतले मिळालेल्या संरक्षणाच्या बळावर शिवाजी नगर घरकुल येथील दोन घरे त्यांनी बळकावलेली आहेत
विले पार्ले , नवी मुंबई सीबीसी , आझाद नगर धुळे , जळगांव शहर , पुणे शिवाजी नगर , जळगांव जिल्हापेठ , नासिक मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत या व्यक्तीला शासनाने पोलीस संरक्षण देण्याचे प्रयोजन काय? असा प्रश्न आहे. त्याला कोणाचे पाठबळ आहे याची शहानिशा प्रशासनाने करावी. पोलीस संरक्षणाच्या नावाखाली कोणावरही बेछुट आरोप करून अधिकाऱ्यांवर दडपण आणतात व तत्कालीन तहसिलदार वैशाली हिंगे यांनी सुद्धा गुन्हे दाखल केलेले आहेत. याबाबतीत राज्य महिला आयोगाकडून संबंधित महिलांवर झालेल्या अत्याचाराविरूद्ध न्यायोक्त कारवाई होणे गरजेचे आहे. त्यांचे पोलीस संरक्षण काढून येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हातुन हद्दपार करावे,
महानगराध्यक्ष अनिल अडकमोल यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले. यावेळी मिलिंद सोनवणे , प्रताप बनसोडे , अनिल लोंढे , भिमराव सोनवणे , संदिपान पाटील, संदिप तायडे उपस्थित होते