जळगाव ( प्रतिनिधी ) – छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांच्याबद्दल काल राज्यपाल भगतसिंह कोशारी यांनी केलेल्या विधानाचा निषेध करीत अँड कुणाल पवार यांनी निषेधाचा इ – मेल राज्यपालांना पाठवला आहे .
या मेल मध्ये अँड कुणाल पवार यांनी म्हटले आहे की , आपल्याला जे संवैधानिक पद भेटले आहे ते शिवाजी महाराजांनी उभारलेल्या स्वराज्यातील राज्यघटने मुळेच आहे असे आम्हाला वाटत आहे महाराज नसते तर नसती अंगणात तुळस आणि मंदिरावर कळस….. महाराजांची युद्धनिती, शस्त्रनिती , अर्थनिती, किल्ले बांधकाम, स्त्री सन्मान , वाचन , लिखाण , राजकारण, भाईचारा वाखणण्याजोगा आहे . तरीपण खंत आहे की आपण त्यांना रामदास स्वामी संदर्भ जोडून त्यांचे खरे गुरू डावलण्याच काम करत आहात आपल्याला आवड असेल तर आणि खरा इतिहास जाणून घ्यायचा असेल तर आम्ही खरी इतिहासाची पुस्तके जी न्यायालयाने देखील मान्य केली आहेत ती द्यायला तयार आहोत आपण आपल्या सवडीने वेळ द्यावा आम्ही सर्व शिव प्रेमी तत्काळ आपली भेट घेवून तुम्हाला अवलोकन करण्यासाठी उपलब्ध करून देवू यापुढे विनंती करून सांगू इच्छितो की शिवाजी महाराज यांचा आदराने उच्चार करावा आपल्या कालच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करतो.