जळगाव ( प्रतिनिधी ) – विवेकानंद फाउंडेशन संचलित शिरसोलीच्या विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन व दहावीच्या मुला मुलींचा निरोप समारंभ फार उत्साहात पार पडला .
संस्थेचे अध्यक्ष गोपाल , उपाध्यक्ष कमलेश बारी , सचिव किरण , विजय पाटील, शिवदास बारी , बापू सुतार , शिवाजी मराठे यावेळी उपस्थित होते . सर्व पालकांनी आपल्या मुलांना फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनसाठी पाठवले होते . आनंद मेळाव्यात उत्तम पदार्थ विद्यार्थ्यांनी बनवून आणले होते
नर्सरी ज्यू, केजी व सि.केजीच्या विदयार्थ्यांनी वेगवेगळ्या समाज सेवकांचा वेष धारण केले. जिजामाता – हर्षिता पाटील, अहिल्याबाई होळकर – यज्ञा काटोले, नरेंद्र मोदी – आराध्या माळी, शिवाजी महाराज – समर्थ बारी हर्षिता खलसे , वैभव नाडे , मानसी काटोले , निशिता वाणी हापती खलसे, दर्शन फुसेकर , भार्गवी खलसे , रूद्र तेलंगे, हर्षल पाटील, सृष्टी चौधरी , नैतीक पाटील, प्रेरणा पाटील , आयुष चव्हाण , हेल्विक भोई , हर्षाली काटोले यांनी सहभाग घेतला.