जामनेर(प्रतिनिधी ) – जामनेर तालुक्यातील भागदरा येथील विवाहितेचा घरात घुसून शिवीगाळ व मारहाण करून विनयभंग केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मंगळवारी २७ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता जामनेर पोलीस स्टेशनला एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, जामनेर तालुक्यातील एका गावात ३५ वर्षीय महीला ह्या आपल्या परिवारासह राहायला आहेत. गावातील राहणारा दादाराव धेंडू जोगी याने २७ डिसेंबर रोजी त्याच्या पत्नीला काहीही शिकवित असल्याचा संशयावरून महिलेला व तिच्या घरातील इतर एका महिलेला शिवीगाळ करून चापटाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच महिलेच्या घरात घसून तिचा हात पकडून विनयभंग केला आहे. याप्रकरणी जामनेर पोलीस स्टेशनला महिलेने दिलेल्या तक्रारीवरून जामनेर पोलीस स्टेशनला संशयित आरोपी दादाराव जोगी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक रामदास कुंभार करीत आहे.