अमळनेर (प्रतिनिधी ) – अमळनेर तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीला एकाने फूस लावून पळवून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमळनेर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील एका गावात राहणारी सतरा वर्षीय अल्पवयनी मुलगी ही आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. २६ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता अल्पवयीन मुलगी ही घरात एकटी असताना गावातील संशयित आरोपी जगदीश पितांबर पाटील याने मुलीला फूस लावून पळवून नेले. याबाबतची तक्रार पीडित मुलीच्या वडिलांनी तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून अमळनेर पोलीस ठाण्यात संशयित आरोपी जगदीश पाटील याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ जे.डी. पाटील करीत आहे.