मुंबई (वृत्तसंस्था) – कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्यानं सध्या संपुर्ण राज्यभरात सुरू असलेले कडक निर्बंध पुढचे काही दिवस वाढविण्यात आल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे. सध्या सुरू असलेला लॉकडाऊन वाढविण्यात आल्याचं राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

वाढवण्यात आलेला लॉकडाऊन हा 7 दिवसांचा असेल की 15 दिवसांचा असेल याबाबतचा निर्णय नंतर घेण्यात येईल तसेच त्याबाबतची नियमावली 1 मे रोजी जाहीर करण्यात येईल असं देखील सांगण्यात आलं आहे. सध्या सुरू असलेला लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. राज्य मंत्रीमंडळाची आज महत्वाची बैठक झाली. त्यामध्ये राज्यात 18 ते 44 वयोगटातील सर्वांनाच कोरोना प्रतिबंधक लस मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच राज्यात सुरू असलेला लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे.







