पारोळा (प्रतिनिधी ) – जि प प्राथ शाळा धाबे, ता पारोळाचे वरीष्ठ शिक्षक गुणवंतराव शिवदास पाटील यांनी स्वतः च्या जीवाची पर्वा न करता आज पर्यंत कोरोना विरुद्ध अनेक उपक्रमात आपला सक्रिय सेवाभाव कायम ठेवत सामाजिक व वैदयकीय पातळीवर उत्कृष्ट योगदान दिले आहे .
या कार्याचे कौतुक वाटुन संस्थापक अध्यक्ष असलेल्या डॉ पृथ्वीराज पाटील व त्यांच्या सहकारींनी छत्रपती प्रतिष्ठान टोळी ता पारोळा यांच्या वतीने कोरोना योद्धा म्हणुन प्रशस्तीपत्र देवुन गौरव केला . छत्रपती प्रतिष्ठान समाजातील गोर गरीब विदयार्थ्यांना मदत, कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान, पर्यावरण रक्षण, वैदयकीय मदत व आरोग्य जागृतीसह अनेक क्षेत्रात उल्लेखनीय व स्तुत्य कार्य करीत आहे .
गुणवंतराव पाटील यांनी राज्य शिक्षक मनवंतराव साळुंखे यांच्या सोबत वुहान चीन येथे कोरोना सुरु झाल्या पासूनच या बाबत शाळेत गावात व शेळावे केंद्रात आजारा बाबत दक्षता, काळजी ,गंभीरता, प्रसार बाबत बाबत जागृती व प्रत्यक्ष उपक्रम राबविण्यास सुरुवात केली .
प्रत्यक्ष जेव्हा लॉक डाऊन झाले तेव्हा घरोघरी याबाबत माहिती देणे मास्क वाटपात सहभाग घेतला.
गांवात तांदुळ व धान्यादी माल वाटला .
रेशन दुकानावर दक्षता म्हणुन आजही सेवा देत आहेत .
मा आरोग्य मंत्री यांच्या आवाहानावरून त्यांच्या मित्र परिवाराच्या साईबाबा संस्थेच्या वतीने रक्तदान शिबिर रामनवमीला आयोजित केले . स्वतः सह ८६ रक्तदाते मिळाले . आता तीन चार दिवसा पुर्वीही शिबिर आयोजित करून ३० रक्ते दाते मिळविले . जे कोरोना रुग्ण किंवा कोरोना वॉरीयर्स साठी वापरण्यात येणार आहे .
सर्वात महत्वाचे म्हणजे लॉक डाऊन काळात अन्नदानात सहभाग घेतला . बालाजी मंदिर अन्नदान समिती पारोळा येथे ९० दिवस सुमारे ६०० गरिब गरजू बांधवांना सकाळ संध्याकाळ अन्न तयार करून पाकिटे वाटप व यासाठी लागणारा निधी त्यांनी आपल्या मित्र परिवाराकडुन जमविण्याच्या कामात मोलाचे योगदान दिले . दिवस दिवसभर कोरोनाच्या संर्सगाला न घाबरता या कार्यात सहभाग घेतला . स्वतः ही आर्थिक योगदान दिले .
त्यांचे या सन्मानाबद्दल ग स माजी संचालक व्ही एम पाटील, राज्य शिक्षक स ध भावसार , के बी रणधीरबाबा , साईबाबा संस्थेचे चारुदत्त मोरे यांच्यासह अनेकांनी अभिनंदन केले .