वाचा दुर्दैवाचे बळी ठरलेल्या दुर्घटनेची कथा
सांगली ( वृत्तसंस्था ) – वास्तूशांतीसाठी कराड तालुक्यातील मलकापूरमधून सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरच्या दिशेने जाणाऱ्या कुटुंबावर काळाने घाला घातला पाठीमागून डंपरने दिलेल्या धडकेत अल्टो कारमधील चौघांचा मृत्यू झाला
या अपघातात एक सात वर्षांची मुलगी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरु आहेत. मलकापूर वस्तीत राहणारं पोळ कुटुंब कारने इस्लामपूरच्या दिशेने निघालं होतं. अधिकराव पोळ (वय ४९), गिताबाई पोळ (वय ७०), सुषमा पोळ (वय ४२), सरीता पोळ (वय ३५) अशी मृतांची नावं आहेत. सात वर्षांची समृद्धी पोळ या अपघातात जखमी झाली
पेठ नाका ते इस्लामपूर मार्गावरुन सांगलीकडे जात असताना समोरील कार चालकाने अचानक ब्रेक मारला. यावेळी पोळ यांनीही ब्रेक मारत कार थांबवण्याचा प्रयत्न केला. परंतू याचवेळी पाठीमागून आलेल्या डंपरने पोळ यांच्या कारला धडक दिली. ज्यात चौघांचा मृत्यू झाला. या अपघातामुळे मलकापूर परिसरावर शोककळा पसरली आहे.