जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील सुप्रीम कॉलनीतील देशी दारूचे दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी २ लाख १५ हजार रुपये लंपास केल्याची घटना काल घडली .
या दुकानाचे व्यवस्थापक भुपेश प्रकाश कुलकर्णी ( वय ३८ , रा. देवेद्र नगर ) यांनी एम आय डी सी पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की , नितीन शामराव तायडे ( रा. दौलत नगर ) यांचे मालकीचे सुप्रीम कॉलनीमध्ये (गजानन बाबा कॉलनी जवळ) हे देशी दारूचे दुकान आहे या दुकानात पवन सुभाष चव्हाण ( रा. रामेश्वर कॉलनी ) हा रोखपाल , मदतनीस गिरीश शिपी व शुभम चव्हाण आणि सफाई कामगार भुषम चांदेलकर हे कामाला आहेत .
२५ मार्चरोजी रोजी पवन चव्हान यांने दिवसभर व्यवसाय केला मी सायकाळी हिशेब घेऊन घरी गेलो २६ मार्चरोजी सकाळी पवन चव्हाण यांने फोन करुन सांगीतले की गोडावुनचे लॉक तोडुन दुकानात प्रवेश करून अज्ञात इसमाने चोरी केली आहे ८४५०० ( ५०० रुपयांच्या १६९ नोटा ) , २०६०० ( २०० रुपयांच्या १०३ नोटा ) , ५४२०० ( १०० रुच्या ५४२ नोटा ) , ५६२१० ( उर्वरीत रक्कम ) असे एकुण २ ,१५ , ५१० रुपये रोख लंपास झाले आहेत . या फिर्यादीवरून एम आय डी सी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .