भोपाळ ( वृत्तसंस्था ) – मध्य प्रदेशातील सतनामध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगणारी महिला गर्भवती झाल्याने खळबळ उडाली आहे. प्रशासनाने दावा केला आहे की, महिला काही वेळासाठी जामिनावर बाहेर होती. यादरम्यान तिला गर्भधारणा झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
सतना तुरुंगात जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाकडून आरोग्य तपासणी शिबीराचं आयोजन करण्यात आलं होतं. महिला आणि पुरुषांची तपासणी करण्यात आली. त्यावेळी कैदी महिलेने पोटदुखीसंदर्भातील तक्रार सांगितली. या महिलेची सोनोग्राफी करण्यात आली. महिला कैदी गर्भवती असल्याचं समोर आलं. नंतर तुरुंग प्रशासनाने तपास सुरू केला
या कैदी महिलेवर पती आणि सासूच्या हत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. 2016 पासून तिच्याविरोधात सुनावणी सुरू आहे. महिला खजुराहो येथील राहणारी आहे 28 फेब्रुवारीरोजी तिला छतरपूर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. 12 मार्च रोजी सतनाच्या तुरुंगात आणण्यात आलं होतं. दरम्यान महिला जामिनावर बाहेर आली होती. यादरम्यान तिला गर्भधारणा झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तपासात ती पाच आठवड्यांची गर्भवती असल्याचं समोर आलं आहे.