जळगाव ( प्रतिनिधी ) – घनकचरा व्यवस्थापनाचे साहित्य न पुरवता जामनेर तालुक्यातील नाचणखेडा ग्रामपंचायतीची फसवणुक करणार्या ठेकेदाराला स्थानिक गुन्हे शाखेने आज भास्कर मार्केटमध्ये अटक केली
विरेंद्रकुमार राजेंद्र पाटील ( रा. मायादेवी मंदिरामागे महाबळ ) असे या अटक केलेल्या ठेकेदाराचे नाव आहे. जामनेर तालुक्यातील नाचणखेडा ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक यांनी घनकचरा व्यवस्थापन साहित्य खरेदीसंदर्भात विरेंद्र कुमार पाटील याला कामाचा मक्ता दिला होता. या कामासाठीचे ५ लाख ५७ हजार १०० रुपये वीरेंद्र कुमार याने घेतले मात्र प्रत्यक्ष साहित्य पुरवलेच नाही. त्यामुळे वीरेंद्र कुमार पाटील याच्याविरोधात पहूर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून म्हणजेच वर्षभरापासून संशयित वीरेंद्रकुमार फरार होता. संशयित जळगावातील भास्कर मार्केट परिसरात असल्याची गोपनीय माहिती शनिवारी जळगाव स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली.
पो नि किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली पो उ नि अमोल देवरे, पो हे कॉ अशरफ शेख, सुनील दामोदरे ,लक्ष्मण पाटील, रणजित जाधव ,किशोर राठोड, श्रीकृष्ण देशमुख, विनोद पाटील, ईश्वर पाटील यांच्या पथकाने संशयित वीरेंद्र कुमार याच्या भास्कर मार्केट परिसरातून अटक केली त्याला पहूर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.