जळगाव (प्रतिनिधी)- जळगाव जिल्ह्यात दिनांक २८ मार्च २०२१ रोजी रात्री ००.०१ वाजेपासून दिनांक ३० मार्च २०२१ रोजी रात्री २४.०० वाजेपर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ लागू करण्यात आले असून सोबतच कडक निर्बंध देखील लागू असणारं आहे,याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी काढले आहे.

जळगाव जिल्ह्यात दिनांक २८ मार्च रोजी होळी व २९ मार्च रोजी २०२१ रोजी धुलिवंदन हे सण साजरा करण्यात येणार असून सदर सणनिमित्त मोठ्या प्रमाणावर नागरिक एकत्र येण्याची शक्यता असल्याने कोविड -19 विषाणूचा संसर्ग, प्रादुर्भावात होणारी वाढ रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनाचा भाग म्हणून जळगाव जिल्ह्यात कडक निर्बंध आवश्यक आहे.
सर्व बाजारपेठा,आठवडे बाजार बंद राहतील, किराणा दुकाने, नॉन इसेन्शियल इतर सर्व दुकाने बंद राहतील, किरकोळ भाजीपाला फळे खरेदी विक्री केंद्र बंद राहतील, शैक्षणिक संस्था, शाळा महाविद्यालय, खासगी कार्यालय, सर्व प्रकारचे धार्मिक स्थळे बंद रातील.केवळ पुजारी दैनंदिन पूजा करेल व लोकांना प्रवेश बंद राहील. हॉटेल रेस्टॉरंट अत्यावश्यक सेवेसाठी घरपोच डिलीवरी पार्सल वगळता बंद राहतील.सभा,मेळावे, बैठका, धार्मिक स्थळे,सांस्कृतिक, धार्मिक व तत्सम कार्यक्रम बंद रातील. शॉपिंग मार्केट, बार्बर शॉप, स्पा सलून,लिकर शॉप, दारू दुकाने, फेरीवाले,बंद रातील.गार्डन, पार्क, बगीचे, सिनेमागृहे, नाट्यगृहे, व्यायाम शाळा, जलतरण तलाव, प्रेक्षकगृह, क्रीडा स्पर्धा,प्रदर्शने, मेळावे, संमेलन,बंद रातील. पान टपरी,हातगाड्या, उघड्यावर खाद्यपदार्थ विक्री ची ठिकाणे बंद रातील.
दूध विक्री केंद्रे केवळ सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत सुरु राहील.कोविड -19 लसीकरण कार्यक्रम सुरु राहील. औद्योगिक आस्थापना सुरु राहील तथापि संबंधितांनी ओळखपत्र बाळगणे अनिवार्य राहील. होळी व धुलिवंदन निमित्त कोणत्याही प्रकारे सामूहिक / सार्वजनिक कार्यक्रम साजरा करता येणार नाही.
वैद्यकीय उपचार व सेवा मेडिकल स्टोअर,ऍम्बुलन्स सेवा, अत्यावश्यक बंधित घटक तसेच पूर्व नियोजित परीक्षा असल्यास परीक्षार्थी व परीक्षेकारिता नेमण्यात आलेल्या अधिकारी, कर्मचारी यांना लागू करण्यात आलेल्या निर्बंधतून सूट देण्यात येत आहे.
जिल्ह्यात लागू करण्यात आलेल्या निर्बंधचे त्याचे पालन होत आहे किंवा नाही याची जबाबदारी संयुक्तरीत्या पोलीस विभाग व संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था यांची राहील.
सदर आदेशाचे उल्लंघन केल्यास सदर भारतीय दंड संहिता 1860 (45 चे कलम 188 आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 51 ते 60 व फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे तरतुदींचा शिक्षेस पात्र राहील.







