चाळीसगाव ( प्रतिनिधी ) – येथील बामोशी बाबा दर्गा येथे झोपडीत राहत असलेल्या कुटुंबात कौटुंबिक वाद झाल्याने, दारूच्या नशेत पतीने 43 वर्षीय पत्नीच्या डोक्यात दगड घालून तिची हत्या केल्याची घटना रात्री घडली
मयताचे नाव मायाबाई भुरा सोनवणे असे असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. चाळीसगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव येथील प्रकाश उर्फ भुरा सोनवणे पत्नीच्या पोटात दुखत असल्याने चाळीसगाव शहरातील पिर मुसा कादरी बाबा दर्गा येथे आलेले असताना चारित्र्यावर संशय घेऊन सोनवणे यांनी दगडाने ठेचून पत्नीचा निघृणपणे हत्या केली. २६ फेब्रुवारी रोजी रात्री शहरातील पिर मुसा कादरी बाबा दर्गा परिसरात घडली. भारतीबाई गायकवाड यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलिस स्थानकात भादवी कलम-३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पोलिस निरीक्षक के. के. पाटील यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सपोनि दिपक बिरारी हे करीत आहेत.