यावल (प्रतिनिधी) – यावल तालुक्यातील उंटावद येथे ओंकारेश्वर मंदीराच्या वर्धापनदिनानिमीत्त अखंड हरीनाम संकिर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
मिती मार्गशीर्ष शु.९ बुधवार दि.२३ पासून सुरू झाले असून यात सकाळी ५ ते ६ काकडा आरती, सकाळी ६ ते ८ गाथा पारायण, सायंकाळी ५ ते ६ हरीपाठ व रात्री ८:३० ते १०:३० किर्तनाचा कार्येक्रम असा दैनंदीन कार्येक्रम होणार असून यात दि.२३ रोजी ह.भ.प.योगेश महाराज चिंचोली, दि.२४ रोजी ह.भ.प.धर्मा महाराज कासारखेडे, दि.२५ रोजी ह.भ.प.चिंतामण महाराज अंजाळेकर, दि.२६ रोजी ह.भ.प.कृष्णा महाराज मुक्ताईनगर, दि.२७ रोजी ह.भ.प.डाँ.विष्णू महाराज भोलाणेकर, दि.२८ रोजी ह.भ.प.राजेंन्द्र महाराज कासोदा, दि.२९ रोजी ह.भ.प.परमेश्वर महाराज जळगांव यांच्या किर्तनाची सेवा लाभणार असुन दि.३० रोजी ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज पाळधी यांचे काल्याचे किर्तन होणार आहे. या किर्तन सप्ताह दरम्यान मृदंगाचार्ये ह.भ.प.आशीष महाराज, ह.भ.प.पंकज महाराज उंटावद, ह.भ.प.विशाल महाराज व शिवदास महाराज आडगाव, ह.भ.प. दगडू महाराज धानोरा, ह.भ.प.प्रकाश महाराज किनगाव, ह.भ.प.हेमंत महाराज कोळन्हावी हे सेवा देणार आहेत.
तसेच हार्मोनियम वादक म्हणून भोजराज महाराज व त्यांचे सहकारी सेवा देणार आहेत तसेच गायनाचार्ये म्हणून ह.भ.प.नारायण महाराज, ह.भ.प.शहादू महाराज, ह.भ.प.बाळू महाराज चिंचोली, ह.भ.प.पिंटू महाराज, ह.भ.प.शाम महाराज, ह.भ.प.भगवान महाराज, ह.भ.प. एकनाथ महाराज, ह.भ.प.साहेबराव महाराज, ह.भ.प.रेवा महाराज डांभुर्णी, ह.भ.प.धर्मा महाराज आडगाव, ह.भ.प.मधु महाराज डोणगाव, ह.भ.प.लिलाधर महाराज किनगाव, ह.भ.प.नरेश महाराज, ह.भ.प.महेश महाराज, ह.भ.प.सोनू महाराज उंटावद यांचे सहकार्ये लाभणार असून विणेकरी म्हणून ह.भ.प.ललित महाराज, ह.भ.प.रमेश महाराज, ह.भ.प.विश्वेश महाराज, ह.भ.प.वैभव महाराज उंटावद, यांची सेवा मिळणार आहे, तर या संकिर्तन सोहळ्याची सांगता दि.३० रोजी सायंकाळी ३ ते ७ दींडी सोहळाण्याने होणार आहे, तरी या अखंड हरीणाम संकिर्तन सोहळ्याचा लाभ परीसरातील भावीकांनी घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.