चाळीसगाव (प्रतिनिधी) – आगामी होऊ घातलेल्या चाळीसगाव तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसंदर्भात शिवसेनेची भूमिका तसेच नियोजन यासाठी शिवसेनेचे तालुका संपर्कप्रमुख प्रकाश वाणी यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली असून यात शिवसेनेच्या विचारांच्या ग्रामीण उमेदवारांना कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी सर्वतोपरी प्रयत्न करून त्यांचे उमेदवारी अर्ज बिनचूक भरण्यासाठी मदत करण्याचे ठरले असून महाविकास आघाडीच्या समन्वयक सदस्यांशी चर्चा करून या निवडणुका लढण्याचे ठरविण्यात आले असून शक्य झाल्यास काही ठिकाणी बिनविरोध निवडणूक करण्याचा देखील प्रयत्न करावा असा सूर या बैठकीत सर्व पदाधिकारी यांच्या मधून निघाला असून शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या आवाहनानुसार जास्तीत जास्त ग्रामपंचायत उमेदवार निवडून आणण्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी कामाला लागावे असा निर्णय यावेळी संपर्कप्रमुख प्रकाश वाणी यांनी दिला आहे.
यावेळी चाळीसगाव शिवसेना तालुकाप्रमुख रमेश आबा चव्हाण, जिल्हा समन्वयक महिंद्र पाटील, दिलीप घोरपडे, सुनील गायकवाड, भिमराव खलाने, जगदीश महाजन, दिलीप पाटील, रघुनाथ कोळी, नकुल पाटील, सोनू कुमावत, हिम्मत निकम, देवचंद ढगे, मुराद पटेल आदी उपस्थित होते.