अमळनेर (प्रतिनिधी) – ए. आय.एम.आय. एम. या राजकीय पक्ष्याच्या अमळनेर शहर अध्यक्ष म्हणून इमरान फारूक खाटीक यांची निवड झाली आहे. विवादित व आक्रमक असे बॅरिस्टर ओवेसी या पक्षाचे बळकट नेते असून इमरान खाटीक युवकांना परिचित आहेत.
त्यांच्या ह्या निवडीचे सर्वत्र स्वागत होत असून शहेबाज शेख, अल्तमश शेख, अक्रम भाई,खालिद खाटीक, आकीब अली,शाहरुख शेख, नइम पठाण, झाकीर कुरेशी यांनीही स्वागत केले आहे.
ए. आय.एम.आय.एम.चे प्रदेश अध्यक्ष अ. गफ्फार कादरी यांच्या आदेशाने व ए. आय.एम.आय.एम.चे जिल्हा अध्यक्ष जिया अहमद बागवान यांच्या नेतृत्वाखाली ही निवड करण्यात आली आहे.