पाचोरा ( प्रतिनिधी) – पाचोरा येथील विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये एका रुग्णाकडे उपचारासाठी पैसे नसल्याने डॉ. सागर गरुड व डॉ भूषण मगर यांनी ऐका रुग्णावर एक रुपया न घेता मोफत उपचार करून जीवदान दिले आहे.
जामनेर तालुक्यातील शिंगाईत गावातील अर्जुन श्रीराम पाटील हा व्यक्ती खूप आजारी होता घरची परिस्थिती अतिशय बिकट असल्याने उपचारासाठी पैसे नव्हते यामुळे आई – वडील चिंताजनक झाले. त्या पेशंटची कोरोना टेस्ट तपासून करून घेतली आणि त्याचा रिपोर्ट करोना पॉझिटिव्ह आल्यामुळे पेशनटच्या वडिलांनी खूप मोठी धास्ती घेतली होती. मात्र कोरोनावर मात करण्यासाठी पैसे नसल्याचे पेशंटच्या वडिलांना डोळ्यात अश्रू आले. एकवेळ त्यांनी विघ्नहर्ता हॉस्पिटलमध्ये डॉ. सागर गरुड व डॉ भूषण मगर यांना भेटून परिस्थितीची बिकट असून उपचारासाठी पैसे नाहीत. मुलाचे उपचार खूप महत्त्वाचे आहे. या बाबत खंत व्यक्त केली. डॉ. भूषण मगर व डॉ. सागर गरुड यांनी अगदी मोठया मनाने पेशनटच्या वडिलांना धीर देत मोफत उपचारासाठी शब्द दिला. या जगात माणसा पेक्षा पैसे मोठे नाही. आरोग्य सेवा हीच ईश्वर सेवा आहे. आम्ही सर्व सामान्य व गोरगरिबांना लुटण्यासाठी नाही, तर त्याची सेवा करण्यासाठी आहोत असे सांगत त्या पेशनट वर शंभर टक्के यशस्वीपणे उपचार करू असा शब्द विघ्नहर्ता हॉस्पिटलमध्ये डॉ. सागर गरुड, डॉ भूषण मगर यांनी दिला. दोघेही डॉक्टर देवाच्या रुपात येऊन खरोखर अर्जुन श्रीराम पाटील या कोरोना पोजीटिव्ह रुग्णावर एक रुपया न घेता मोफत उपचार करण्यासाठी धावून आले. डॉ भूषण मगर व डॉ सागर गरुड यांचे वैधकीय सेवेत माणुसकी सेवा हीच ईश्वर सेवा हे व्रत पूर्ण करतांना दिसून आले व सर्व व गरीब रुग्णांना आता माणुसकीवरचा विश्वास अजून घट्ट झाला, त्यामुळे त्यांचे नातेवाइकांकडून व सर्वस्तरातून खूप खूप अभिनंदन केले जात आहे. व माणुसकी समूहाचा सलाम.