पाचोरा (प्रतिनिधी) – तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित , श्री. गो. से. हायस्कूल, पाचोरा येथे आज संविधान दिन साजरा करण्यात आला. सदर प्रसंगी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे व भारताचे संविधान पुस्तकाचे प्रतिमेचे पूजन करण्यात आले. संविधान दिनानिमित्त पर्यवेक्षक अजय अहिरे यांनी संविधानाचे वाचन केले.
याप्रसंगी मुख्याध्यापक सुधीर पाटील, उपमुख्याध्यापिका प्रमिला वाघ, कार्यालय प्रमुख अजय सिनकर ,पर्यवेक्षक आर. एल.पाटील व एन. आर. पाटील व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बंधू उपस्थित होते.








