जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव शहरातील मेहरूण परिसरातून एकाची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अहमदखान नसिरखान मुल्ताणी (वय-४१) रा. गणेशपुरी मेहरूण, जळगाव हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. व्यापार करून आपला उदरनिर्वाह करतात. दिवसभराचे काम आटोपून त्यांनी त्यांची दुचाकी (एमएच १९ डीए ६३९६) ही ८ मे रोजी रात्री ९.३० वाजता घरासमोरील गेटजवळ पार्क करून लावली होती. अज्ञात चोरट्यांनी हॅण्डलचे लॉक तोडून ३५ हजार रूपये किंमतीची दुचाकी चोरून नेल्याचे उघडकीला आले. त्यांनी परिसरात दुचाकीचा शोध घेतला परंतू दुचाकी कुठेही आढळून आली नाही. अखेर बुधवार २५ मे रोजी रात्री ९ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक गणेश शिरसाळे करीत आहे.