मुंबई (वृत्तसंस्था) – IPS अधिकारी सुबोधकुमार जयस्वाल यांची केंद्रीय अन्वेषण ब्युरो अर्थात सीबीआयचे संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील मुख्य न्यायाधीश एन.व्ही. रमणा आणि कॉंग्रेसचे लोकसभेचे नेते अधीर रंजन चौधरी यांचा समावेश असलेल्या उच्चस्तरीय समितीने हा निर्णय घेतला आहे. सुबोध जयस्वाल यांनी यापूर्वी महाराष्ट्र पोलिस महासंचालक म्हणून काम पाहिले आहे.

मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने (ACC) जारी केलेल्या आदेशानुसार सुबोध जयस्वाल हे लवकरच सीबीआयच्या संचालकपदाचा ताबा घेतील. फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून म्हणजेच ऋषी कुमार शुक्ला यांनी आपला कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर आतापर्यंत सीबीआयचे संचालक पद रिक्त होते. अतिरिक्त संचालक प्रवीण सिन्हा अंतरिम प्रमुख म्हणून मुख्य तपास यंत्रणेचे काम पहात आहेत.







