चाळीसगाव (प्रतिनिधी ) – वीज पुरवठा खंडित करण्यात आल्याचा राग येऊन एका वीज ग्राहकांनी महावितरण कंपनीच्या सहायक अभियंताला चापट बुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना शहरात घडली आहे. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
शहरातील फुले कॉलनीतील धनराज अशोक पाटील या वीज ग्राहकांचे गेल्या काही दिवसांपासून वीज पुरवठा खंडित आहे. त्यावर पाटील यांनी शहरातील महावितरण कंपनीचा कार्यालय गाठून दोन दिवसांपूर्वीच मी लाईट बिलाची थकबाकी भरली आहे. त्यामुळे वीज पुरवठा पूर्ववत करण्याबाबत सहायक अभियंता भरत धन्यकुमार उकलकर (वय-४२) यांना सांगितलं. तेव्हा सहायक अभियंता उकलकर यांनी तुमचा वीज पुरवठा कायमस्वरूपी खंडित करण्यात आला आहे. यामुळे तुम्हाला नवीन वीज कनेक्शन घ्यावे लागेल. असे सांगितले. याचाच राग आल्याने धनराज अशोक पाटील यांनी सहायक अभियंता उकलकर यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. दरम्यान याबाबत पोलीस स्थानकात तक्रार नोंदविण्यासाठी उकलकर हे कार्यालयाच्या बाहेर आले असता पाटील यांनी शिवीगाळ करून चापट बुक्क्यांनी मारहाण केली. हि घटना २५ मार्च रोजी दुपारी १:१५ वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी उकलकर यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलिस स्थानकात भादवी कलम- ३५३, ३३२, १८६, ५०४, ५०६ अशा विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पोलिस निरीक्षक के. के. पाटील यांच्या निर्देशानुसार पुढील तपास पोउनि आव्हाड हे करीत आहेत.